औरंगाबाद- जालना रोडवरील केंब्रिज स्कूल चौकातून एका कारमधून पंधरा लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी पळविल्याची घटना आज गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना कळताच सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नाकाबंदी केली आहे.
पाचोड येथील वर्धमान नगरी सहकारी बँकेची रोकड
घेऊन कर्मचारी कार (क्र. एमएच २०/ईई ९८५०) ने औरंगाबाद येथे येत होते. बीड बायपासकडून
सुंदरवाडी उड्डाणपुलावरून जालना रोडकडे ही कार आली. त्यावेळी चालकाने केंब्रिज स्कूल
चौकात कार थांबवली. तेव्हा कारमधून बॅग लंपास झाल्याचे कारचालकाला कळाले. रोकड
असलेली बॅग चोरट्यांनी पळवली की, ती कारमधून पडली,
हे मात्र अद्याप
समजू शकले नाही. याबाबत पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना विचारणा केली असता,
आम्ही घटनास्थळी
जात आहोत,
अशी माहिती
त्यांनी दिली.
एमआयडीसी पोलिस ठाणे कार्येक्षेत्रातील दुसरी
घटना
महिन्याभरापूर्वी सिडको एमआयडीसी पोलिस
ठाण्याच्या हद्दीतील ङ्गभारत बाजारफ परिसरातून कारमध्ये ठेवलेली ३० लाख रुपयांची
बॅग चोरट्यांनी पळवली होती. त्यानंतर आज पुन्हा याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत
केंब्रिज स्कूल चौकात अशीच दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या
कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.












